Ad will apear here
Next
‘चित्रस्पंदन’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन
युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनोखा उपक्रम

पुणे : ‘मन:सृष्टी - सेंटर फॉर सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड स्टडिज’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ‘स्व-विकासासाठी चित्रपट महोत्सव’ या संकल्पनेवर आधारित ‘चित्रस्पंदन’ या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सात आणि आठ जानेवारी असे दोन दिवस हा महोत्सव चालणार असून, मनाला भिडतील असे काही चित्रपट, लघूपट आणि गप्पांची मैफल असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे.

सोमवार-मंगळवार (७-८ जानेवारी) दोन दिवस हा महोत्सव मयुर कॉलनी, कोथरुडमधील बालशिक्षण मंदिर शाळेच्या सभागृहात होणार आहे. खास युवकांसाठी असलेल्या या महोत्सवात इतर वयोगटातील व्यक्तींसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. तसेच युवकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि गट यांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहे. 

मोठे लोक विरंगुळा म्हणून, तरुण मुले आवड म्हणून, काहीजण सवय म्हणून, तर काही पॅशन म्हणून चित्रपट पाहत असतात. म्हणजेच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच सिनेमा पाहत असतात. परंतु यापैकी किती जण या चित्रपटाचा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करून घेताना दिसतात? असा विचार केल्यास ही संख्या नगण्य दिसेल. या चित्रपटाचा माझ्यावर किती प्रभाव आहे? माझ्या वागण्यावर, बोलण्यावर, कपडे घालण्यावर, सवयींवर, खरेदीवर, भावनांवर आणि स्वप्नांवरसुद्धा सिनेमाचा काय परिणाम झालेला आहे, होतो आहे, हे माझ्या लक्षात आले आहे का? असा विचार आपण करत नसाल, तर तो केला पाहिजे आणि असे केले, तर चित्रपट हे माध्यमही तुमचा व्यक्तिगत विकास करणारे एक उत्तम माध्यम ठरू शकते.

‘चित्रपटाचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी, स्वास्थ्यासाठी कसा करता येऊ शकतो याची झलक मिळावी म्हणून ‘चित्रस्पंदन’ - स्व-विकासासाठी चित्रपट महोत्सव’ ही संकल्पना घेऊन आम्ही येत आहोत. मनाला भावतील आणि भिडतील असे चित्रपट, लघूपट आणि त्यानंतर गप्पांची मैफल असे या चित्रपट महोत्सवाचे स्वरूप असणार आहे. मन:सृष्टीमार्फत आजवर युवकांच्या मानसिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. यानंतरही अनेक नवीन उपक्रम होतील. याचाच भाग म्हणून हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे’, अशी माहिती संस्थेचे निखिल वाळकीकर यांनी दिली. 

अधिक माहिती व संपर्क - 
चित्रस्पंदन चित्रपट महोत्सव
तारिख : ७ व ८ जानेवारी २०१९ (सोमवार/मंगळवार)
स्थळ : बाल शिक्षण मंदिर शाळेचे सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड. पुणे.
देणगी प्रवेशिका : २५०/- रुपये
ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क : Townscript.com/ChitraSpandan-2019
मोबाईल : ९५४५५ २३७२०, ८९७५३ ८०९८७ 
युवकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांच्यासाठी संपर्क क्रमांक : ७०६६० ८२०७२, ९०२८० ९५०३२ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZXVBW
Similar Posts
‘मनःसृष्टी’तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन पुणे : ‘मन:सृष्टी - सेंटर फॉर सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड स्टडिज’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्षमा’ हा यंदाच्या निबंध स्पर्धेचा विषय असून या विषयावरील निबंध ३१ जुलैपर्यंत मनःसृष्टीच्या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष निखिल वाळकीकर यांनी केले आहे
‘इफ्फी’च्या निमित्ताने... गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी’ २१ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या या महोत्सवात ६८ देशांमधील २१२ चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यात ४५ भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. २०१८ हे या महोत्सवाचे ४९वे वर्ष आहे. त्या निमित्ताने, ‘इफ्फी’ची सुरुवात कशी झाली, या महोत्सवातील
सरहदच्या वतीने जम्मू-काश्मीर चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुणे : ‘गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त| हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त’ म्हणजे पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे. अशा शब्दात ज्याचे वर्णन केले जाते त्या जम्मू-काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याने कायमच पर्यटकांसह चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनाही भुरळ घातली आहे. त्यामुळे अनेक चित्रपट या पृथ्वीवरच्या नंदनवनात चित्रित झाले आहेत
‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एन्जेलिस’मध्ये तब्बूचा सन्मान नवी दिल्ली : एप्रिल २०१९मध्ये लॉस एन्जेलिस याठिकाणी होत असलेल्या ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एन्जेलिस (IFFLA)’मध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेती बॉलीवूड अभिनेत्री तब्बू हिचा सन्मान केला जाणार आहे. या महोत्सवाचे हे १७वे वर्ष असून यंदा ११ ते १४ एप्रिलदरम्यान ‘लॉस एन्जेलिस’ येथील ‘बार्को इनोव्हेशन सेंटर’ याठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language